पाकिस्तानच्या उलट्या बोंबा; म्हणे, रॉ ने घडवला हल्ला

Foto
भारतात भीषण असा दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या जैश ए मोहम्मद या पाकिस्तानस्थित आतंकवादी संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही पाकिस्तानच्या उलट्या बोंबा मारणे सुरूच आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ नेच हा हल्ला घडविल्याचा आरोप पाकिस्तानचे माजी गृहमंत्री व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते रेहमान मलिक यांनी केला आहे. 
 डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने  दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कि कुलभूषण जाधव यांचे प्रकरण सुनावणीसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात येणार असल्याने या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी रॉ ने हे षडयंत्र रचले आहे. एव्हढे बरळूनच ते थांबले नाहीत. तर, प्रत्येक दहशतवादी हल्ला हा भारतच घडवतो व पाकिस्तानला या हल्ल्यांसाठी जबाबदार ठरवतो, असेही ते यावेळी म्हणाले. समझोता एक्सप्रेस मध्ये झालेल्या हल्ल्याला देखील भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.